आधी क्रिकेटचं मैदान गाजवलं अन् आता मनोज जरांगेंनी लेझीमचा घेतला आनंद, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 23:15 IST2023-12-29T23:10:56+5:302023-12-29T23:15:01+5:30
२० जानेवारीला मनोज जरांगे मुंबई येथे आमरण उपोषण करण्यासाठी पायी जाणार आहे.

आधी क्रिकेटचं मैदान गाजवलं अन् आता मनोज जरांगेंनी लेझीमचा घेतला आनंद, पाहा Video
मागील आठवड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत क्रिकेटचे मैदान गाजवले. त्यानंतर आज जालन्यात लेझीम खेळाचा आनंद घेत मनोज जरांगे यांनी उपस्थितांची मनं जिंकली.
२० जानेवारीला मनोज जरांगे मुंबई येथे आमरण उपोषण करण्यासाठी पायी जाणार आहे. अंतरवाली सराटी, ते मुंबई दरम्यान सहज हसत खेळत पार पडावा म्हणून पांरपारिक खेळ, पारंपरिक वाद्ये आणि किर्तन, पवाडे, प्रवचनेयासह अनेक बाबींचा समावेश करून आनंदात मजल सर करणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
आंदोलनाची पुर्व तयारी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना कालच हाँस्पिटलमधून सुट्टी मिळाली. काहीशी तब्येत बरोबर नसतानाही ग्रामस्थांचा लेझीम खेळ सुरू असता जरांगे पाटील यांनीही लेझीम खेळ खेळला. यावेळी पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
पाहा व्हिडिओ-
मागील आठवड्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत क्रिकेटचे मैदान गाजवले. त्यानंतर आज जालन्यात लेझीम खेळाचा आनंद घेत उपस्थितांची मनं जिंकली.#manojjarangepatil#MarathaReservationpic.twitter.com/QqDDuQeZJp
— Lokmat (@lokmat) December 29, 2023