शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी लाच घेणारा मंडळ अधिकारी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:45 PM

वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोहिलागड (ता.अंबड) येथील मंडळाधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

जालना :  वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोहिलागड (ता.अंबड) येथील मंडळाधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. विष्णू भगवानराव जायभाये (४८ रा. उस्मानपुरा, औरंगाबाद) असे लाच स्वीकारणाऱ्या मंडळाधिकाऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. वाळू वाहतुकीचा हायवा न पकडण्यासाठी, तसेच नियमित वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मंडळाधिकारी जायभाये याने तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली होती. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी अंबड तालुक्यातील दूनगाव फाटा येथे पंचासमक्ष जावून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. सोमवारी सकाळी औरंगाबाद-बीड हायवेवरील झोडेगाव फाटा येथे सापळा लावून मंडळाधिकारी जायभाये यास तक्रादाराकडून आठ हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद, व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, संतोष धायडे, अमोल आगलावे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारsandवाळूAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग