शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात गोळी घालून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:54 IST

बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवासी संजय किसनराव अंभोरे (४०) यांची मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात दोन युवकांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली.

जालना/शेलगांव (जि. जालना) : बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवासी संजय किसनराव अंभोरे (४०) यांची मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात दोन युवकांनी डोक्यात गोळी घालून हत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरा एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.अंभोरे यांचा औद्योगिक वसाहतीत कामगार पुरविण्याचा व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळी अंभोरे हे शेलगाव येथील एका पानटपरीजवळ बसले असताना विनाक्रमांकाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी डोक्यात लागून काही क्षणात अंभोरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले. इतरांना काही कळायच्या आत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. अंभोरे यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या संख्येने जमाव जमला होता. आरोपींना पकडल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका जमावाने घेतली होती. पोलिसांनी जमावाला शांत करीत घाटी रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. अंभोरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे.पाठलाग करणाऱ्यावरही गोळीबारसंजय अंभोरे यांच्यावर गोळीबार करून पळून जाणा-या आरोपीचा एका युवकाने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्याच्यावरही गोळीबार केला. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. हल्लेखोरांनी एक गोळी हवेतही झाडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.एकजण ताब्यातसंजय अंभोरे खून नेमका कोणत्या कारणावरून झाला याचा पोलीस तपास करीत आहे. याप्रकरणी रात्री उशिरा एका संशयिताला अटक करण्यात आली. वर्षभरापूर्वी अंभोरे यांच्यासोबत झालेल्या भांडणातील हा संशयित असून त्याचा कसून तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस