गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:58 IST2019-06-18T23:57:33+5:302019-06-18T23:58:25+5:30

जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगारास एडीएसच्या पथकाने मंगळवारी अटक केली.

Living cartridge seized with a pistol | गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

गावठी पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगारास एडीएसच्या पथकाने मंगळवारी अटक केली. रामदास गणपत बरडे (२५. रा. जालोरा ता. अंबड) असे आरोपीचे नाव आहे.
एडीएसचे पोनि. यशवंत जाधव यांना गुप्त माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रामदास बरडे हा काही दिवसांपासून गावठी पिस्तूल वापरत असून तो सध्या अंबड चौफुली येथे आला आहे. या माहितीवरुन सदर ठिकाणी पथक पाठवले असता, यशवंती ढाब्यासमोर एक इसम दिसल्याने त्यास परिचय देऊन त्याची विचारपूस केली. त्यास गावठी पिस्तुलाबाबत चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा केला. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने गावठी पिस्तूल असल्याची कबुली दिली. त्याने हेी पिस्तूल संतोष जोगदंड (रा. बीड) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.

Web Title: Living cartridge seized with a pistol