माझे म्हणणे ऐका.. नसता उडी घेण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:04 IST2018-12-18T01:03:41+5:302018-12-18T01:04:10+5:30

मुलांनी चिडवल्याचा राग अनावर झाल्याने युवकाने महाविद्यालयाच्या इमारतीवर जाऊन माझी काही चूक नाही...माझे म्हणणे ऐका नसता येथून उडी घेईल, असे म्हणत महाविद्यालय परिसरात खळबळ उडवून दिल्याची घटना सोमवारी अंबड येथील एका महाविद्यालयात घडली.

Listen to me. I do not want to jump | माझे म्हणणे ऐका.. नसता उडी घेण्याची धमकी

माझे म्हणणे ऐका.. नसता उडी घेण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : मुलांनी चिडवल्याचा राग अनावर झाल्याने युवकाने महाविद्यालयाच्या इमारतीवर जाऊन माझी काही चूक नाही...माझे म्हणणे ऐका नसता येथून उडी घेईल, असे म्हणत महाविद्यालय परिसरात खळबळ उडवून दिल्याची घटना सोमवारी अंबड येथील एका महाविद्यालयात घडली.
अंबड येथील एका कॉलेजमध्ये मध्ये दोन ते तीन महिन्यापूर्वी दोन तरुणांमध्ये भांडण झाले होते, वारंवार भांडण करत असल्यामुळे कॉलेज प्रशासनाने एका विद्यार्थ्यांला कॉलेज मधून काढले होते. सोमवारी तो मुलगा आपल्या मित्राला भेटण्यासाठी आला होता. मित्राला बोलत असताना काही मुलांनी त्याला चिडवले की, याला कॉलेजमधून काढून टाकले. हा राग अनावर झाल्याने तो कॉलेजच्या इमारतीवर चढला आणि आणि माझे म्हणणे ऐका, माझी काही चूक नाही असे सांगू लागला. एक मुलगा इमारतीवर चढला ही वार्ता संपूर्ण कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली त्याला बघण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती. मात्र तो काय बोलणार होता हे कोणीच ऐकले नाही आणि त्याला खाली उतरवले
संबंधित विद्यार्थी खाली आल्यावर त्याची समजूत काढण्यात आली. तोपर्यत पोलीस दाखल झाले होते. हा विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला नाही.

Web Title: Listen to me. I do not want to jump