परतूर येथे लायन्स क्लबतर्फे चार दिवसांत शंभर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:48 IST2019-03-05T00:47:56+5:302019-03-05T00:48:34+5:30
लायन्स क्लबतर्फे चार दिवसांमध्ये जवळपास शंभर रूग्णांवर औरंगाबाद व जळगाव येथील रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

परतूर येथे लायन्स क्लबतर्फे चार दिवसांत शंभर शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : येथील लायन्स क्लबतर्फे चार दिवसांमध्ये जवळपास शंभर रूग्णांवर औरंगाबाद व जळगाव येथील रूग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
परतूर लायन्स क्लबतर्फे नेत्र दोष असलेल्या रूग्णांसाठी शिबिराचे आयोजन करून यातून शस्त्रक्रियेसाठी रूग्णांची निवड करण्यात येत आहे. यातील निवड झालेल्या रूग्णांना औरंगाबाद येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येतात. परंतु, रूग्णांची ‘वेटिंग’ यादी वाढल्याने आता या यादीतील रूग्ण जळगाव येथेही पाठवण्यात येत आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये औरंगाबाद व जळगाव येथील रूग्णालयात जवळपास शंभर रूग्णांवर नेत्र शस्त्रक्रि या करण्यात आल्या. यासाठी लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. भानुदास कदम, ओंकार कदम, संजीवनी खालापुरे, परेश पाटील, संदीप जगताप, राहुल सातोनकर, सुनील कासट, महेश होलाणी, शिल्पा होलाणी, दत्ता खवल, जयश्री खवल, प्रा. प्रमोद टेकाळे, अलका टेकाळे, प्रा. सिध्दार्थ कुलकर्णी, संपतराव खालापुरेसह लायन्सचे सदस्य प्रयत्न करत आहेत.