बिबट्याने पाडला रानडुकरांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:10 IST2018-06-09T01:10:37+5:302018-06-09T01:10:37+5:30

अंंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवारात बिबट्याने एका रानडुकरावर हल्ला केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला.

Leopard's terror in Churmapuri Shivar | बिबट्याने पाडला रानडुकरांचा फडशा

बिबट्याने पाडला रानडुकरांचा फडशा

अंकुशनगर : अंंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवारात बिबट्याने एका रानडुकरावर हल्ला केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. बैलगाडी घेऊन जाणाऱ्या एका शेतक-याने हा प्रकार पाहिल्यानंतर बिबट्याने डरकाळी फोडून मृत अवस्थेतील रानडुकराला सोडून पळ काढला.
गावातील लोकांना याबद्दल माहिती कळाली असता त्यांनी मोटारसायकलवरून धाव घेऊन बॅटरीच्या उजेडात पाहिले असता बिबट्याने रानडुकराचे लचके तोडलेले दिसले. बिबट्या चुर्मापुरी शिवारात बिबट्या दिसल्याच्या घटनेने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पाणी असूनसुद्धा ते पिकांना देणे शेतक-यांना कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वडीगोद्री शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वन विभागाच्या अधिका-यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी संभाजी चव्हाण, प्रल्हाद रसाळ, रवी बकाल, संदीप फटांगडे, राजू सावंत, सुरेश गटकळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Leopard's terror in Churmapuri Shivar