पाच लाख रुपयांचे एलसीडी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:05 IST2018-10-02T01:04:36+5:302018-10-02T01:05:06+5:30

दिल्ली येथून माल घेऊन बंगळुरू येथे जाण्यासाठी निघालेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी २५ एलसीडी टीव्ही लंपास केल्या

LCD stolen of five lakh rupees | पाच लाख रुपयांचे एलसीडी चोरीस

पाच लाख रुपयांचे एलसीडी चोरीस

लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : दिल्ली येथून माल घेऊन बंगळुरू येथे जाण्यासाठी निघालेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यांनी २५ एलसीडी टीव्ही लंपास केल्या. ही घटना गुरुवारी रात्री १ ते ५ वाजेच्या दरम्यान बावणे पांगरी येथे घडली.
दिल्ली येथून जमशेद अंसमोहम्मद हे कंटेनर (क्रं.पीबी. १३.एएल.८४८१) मधून एम. आय. कंपनीच्या ४३ इंचीच्या २४ एलसीडी घेवून जालना येथून जात होते. गुरुवारी रात्री झोप येत असल्याने जमशेद यांनी बावणे पांगरी येथील एका पंक्चंर दुकानाजवळ कंटेनर उभा करुन झोप घेतली. झोप लागल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कंटेनरच्या पाठीमागील दरवाजाचे शिल तोडून यामधील २४ एलसीडी चोरुन नेल्या.

Web Title: LCD stolen of five lakh rupees