शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! मराठवाड्यातील दगडी ज्वारी, कुंथलगिरी पेढ्यासह एकूण आठ वस्तूंना जीआय टॅग

By शिवाजी कदम | Updated: June 12, 2023 18:41 IST

मराठवाड्यातील एकूण ८ उत्पादनांना भौगोलिक मानांकन; कवडी माळ, तांबुल पानाचाही समावेश 

जालना: पैठणीला जीआय टॅग अर्थात भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर मराठवाड्यातील आठ उत्पादनांना जीआय टॅग मिळणार आहे. यात जालन्याची दगडी ज्वारी, कुंथलगिरीचा पेढा, तुळजाभवानीची कवडी माळ, माहूर येथील श्री रेणुका मातेचे तांबूल पान यांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत या उत्पादनांना चेन्नई येथील जिओग्राफिकल इंडिकेश कार्यालयाकडून भौगोलिक मान्यता मिळणार आहे. या उत्पादनांच्या जीआय टॅगिंगला संमती देत असल्याचे पत्र जीआय कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर उत्पादनांची वेगळी ओळख जगभरात निर्माण होण्यास मदत होईल.

ज्या भागामध्ये वस्तूचे किंवा पदार्थांचे उत्पादन होते, ही त्या भागाची ओळख असते. अशा उत्पादनांची भौगोलिक ओळख कायम राहावी यासाठी भौगोलिक मानांकन देण्यात येते. या यादीत आता मराठवाड्यातील आठ उत्पादनांचा समावेश होणार आहे. यात जालन्याची दगडी ज्वारी, धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरी पेढा, तुळजापुरी कवड्याची माळ, नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुका मातेचे तांबूल पान, लातूर जिल्ह्यातील पानचिंच, बोरसरी डाळ, कास्ती कोथिंबीर आणि मुरूडचा अडकित्ता यांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी जीआय कार्यालयाकडून उत्पादकांना पत्र देण्यात आले आहे. यानुसार, या उत्पादनांना तत्त्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ज्वारीला नवी ओळखजालना जिल्ह्यातील दगडी ज्वारीच्या जीआय टॅग प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ज्वारीला नवी वेगळी ओळख मिळणार आहे. बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी येथील जय किसान शेतकरी गटाने दगडी ज्वारीला भौगोलिक मानांकनासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. काही किरकोळ बाबींची पूर्तता केल्यानंतर ज्वारीला अधिकृत जीआय टॅग मिळेल. मराठवाड्यासह देशात प्रसिद्ध असलेल्या कुंथलगिरी पेढ्यालादेखील तत्त्वत: मान्यता देण्यात आली असल्याचे जीआयतज्ज्ञ गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.

उत्पादनांची तपासणीमागील वर्षी अठरा प्रस्ताव दाखल केले होते. तपासणीनंतर मराठवाड्यातील आठ उत्पादनांना जीआय कार्यालयाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र उत्पादनांना देण्यात येईल. मान्यतेनंतर वस्तूंचे किंवा पदार्थांचे उत्पादन करण्यासाठी जीआय टॅग असणाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे बनावट मालाला आळा बसण्यास मदत होईल.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाfoodअन्नtourismपर्यटन