शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

सर्वच विभागाला लेटलतीफचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 12:24 AM

तहसील कार्यालयात सकाळी ९.४५ मिनिटानी तहसील कार्यालयात आमचे प्रतिनिधी पोहोचले असता तेथे तहसीलदारांसह अनेक कर्मचारी गैरहजर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तहसील कार्यालयात सकाळी ९.४५ मिनिटानी तहसील कार्यालयात आमचे प्रतिनिधी पोहोचले असता तेथे तहसीलदारांसह अनेक कर्मचारी गैरहजर होते. १७ पैकी ५ कर्मचारी उपस्थित होते.साफसफाई देखील सुरूच असल्याचे दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये १२ पैकी ९ कर्मचारी वेळेवर पोहोचले नव्हते. स्वत: उपअभियंताही गैरहजर दिसून आले. १० वाजता चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यालयाची झाडझूड करताना दिसून आले.भोकरदन पालिकेतील चित्रही असेच होते. मुख्याधिकारी देखील पावणेदहा वाजता हजर नव्हते. १९ पैकी केवळ ६ कर्मचारी पावणेदहा वाजता उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयातही अशीच स्थिती होती.स्वत: उपविभागीय अधिकारी देखील वेळेवर पोहोचले नव्हते. येथे १२ पैकी ५ कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. दरम्यान, लोकमतचे प्रतिनिधी कार्यालयात येऊन गेल्याचे कळल्यावर खळबळ उडाली. तहसीलदारांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून यापुढे उशिरा येणे खपवून घेतले जाणार नाही, अशा सूचना दिल्या.जाफराबादमध्ये अनेक कार्यालयांमध्ये शुकशुकाटजाफराबाद : येथील पंचायत समिती, कृषी विभाग, नगरपंचायत कार्यालय, बांधकाम विभाग येथे आमच्या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यालयाची साफसफाई करताना दिसून आले. परंतु कुठलाच अधिकारी आणि कर्मचारी मात्र वेळेमध्ये हजर नसल्याचे दिसून आले.जाफराबाद येथील कार्यालयेही रामभरोसेच असतात. येथे कुठल्याच लोकप्रतिनिधी अथवा जबाबदार अधिका-याचे नियंत्रण नसल्याने अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या मर्जीनुसार कार्यालयात येऊन कामकाज उरकतात. जाफराबाद येथे भोकरदन, सिल्लोड, औरंगाबाद, चिखली, देऊळगावराजा, जालना येथून कर्मचारी अप-डाऊन करतात. त्यामुळे अनेक कामे अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने प्रलंबित राहतात.ग्रामीण भागातून येणाºया ग्रामस्थांची अधिकारी आणि कर्मचारी नसल्याने गैरसोय होते. दरम्यान, तहसीलदार सतीश सोनी हे व अन्य काही कर्मचारी कार्यालयात वेळेवर आले होते. परंतु याच कार्यालयातील अनेकजण हजर नसल्याचे वास्तव होते.परतूरमध्ये पावणेदहानंतरच साहेबांची कार्यालयात ‘एन्ट्री’लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यात पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यानंतरचा मंगळवार हा पहिला दिवस होता. कार्यालयात येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेत झालेल्या बदलाकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गंभीरतेने न घेतल्याचे वास्तव परतूर शहरात दिसून आले. सकाळी पावणेदहा वाजता अनेक कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी हे पावणेदहा वाजेनंतरच आल्याचे दिसून आले.मंगळवारी शहरातील काही महत्वाच्या व प्रमुख कार्यालयाचे लोकमत च्या वतीने सकाळी ९:३० ते १०:०० च्या दरम्यान स्टिींग आॅपरेशन केले. जि.प.चे उपविभागीय कार्यालयात ९: ३० वा. एक सेवक साफसाफाई करत होता मुख्य अभियंता यांच्या खुर्चीसह ईतर खुचर्््या रिकाम्या होत्या. सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे कार्यालास चक्क कूलूपच आढळले. उपविभागीय अधीकारी कार्यालयाचे दार अर्धवट उघडले होते. आवक - जावक विभागात दोन - तीन कर्मचारी होते, उपविभागीय अघिकाºयांची खुर्ची रिकमीच होती. तहसील कार्यालयात दहा ते बारा कर्मचारी आढळले. तहसीलादार हे देखील कार्यालयात वेळेवर आले नसल्याचे दिसून आले. उपविभागीय जलसंधारण कार्यालयात नेहमी प्रमाणेच शुकशुकाट आढळला. दोन सेवक कार्यालयात दिसत होते. पंचायत समीतीत गटविकास अधिकारी कार्यालयाची साफसफाई सुरू होती. तीन - चार कर्मचारी कार्यालय परिसरात फिरतांना दिसत होते. उपविभागीय अभयंता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कार्यालयातील मुख्य अभयंता यांची खुर्ची रिकामीच आढळली. ईतर खुर्च्याही कर्मंचा-यांची वाट पाहत होत्या.एकूणच कार्यालयात नेहमीच उशीरा येणे, किंवा रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे येणे व जाणे हे अंगवळणी पडल्याने हा पाच दिवसाचा आठवडा व या काळात पाळावयाची कार्यालयीन वेळ हे अधिकारी व कर्मचा-यांना अवघड वाटत आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारRevenue Departmentमहसूल विभागpwdसार्वजनिक बांधकाम विभागpanchayat samitiपंचायत समिती