जालन्यात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

By विजय मुंडे  | Updated: July 31, 2023 19:47 IST2023-07-31T19:47:17+5:302023-07-31T19:47:38+5:30

जालना शहरातील गांधी चमन भागात हे आंदोलन करण्यात आले.

Jode Maro agitaion to Sambhaji Bhide's image in Jalna | जालन्यात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

जालन्यात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

जालना : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल अनुद्गार काढल्यामुळे संभाजी भिडे यांचा राष्ट्रीय एकात्मता मंचच्या वतीने सोमवारी निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

जालना शहरातील गांधी चमन भागात हे आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी आणि महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी चुकीच्या पद्धतीने अपशब्द काढून भिडे यांनी महापुरुषांचा घोर अपमान केलेला आहे. यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली असून, अशांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकबाल पाशा, बाबुराव सत्कार, धर्माजी खिल्लारे, वैजनाथ लोंढे, प्रल्हाद पडूल यांनीही भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी सगिर अहमद रजवी, योगेश चिरखे, राजेंद्र गोरे, प्रभाकर सुळसुळे, राहुल गवारे, गोपाल आम्लेकर, अलीम शेख आदींची उपस्थिती होती.

Web Title: Jode Maro agitaion to Sambhaji Bhide's image in Jalna