जालना: राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी सुरू असून, अनेक ठिकाणी निकाल जाहीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जालन्यातील एका निकालाची सध्या चर्चा सुरू आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी असलेला श्रीकांत पांगारकर जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाला आहे.
अपक्ष म्हणून विजय
श्रीकांत पांगारकरने जालना महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मतमोजणीअंती त्याला विजयी घोषित करण्यात आले. आपल्या विजयानंतर पांगारकरने समर्थकांसोबत जल्लोषही साजरा केला.
विजयाचा जल्लोष, व्हिडीओ व्हायरल
निवडणूक जिंकल्यानंतर श्रीकांत पांगारकरने ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळत विजयाचा आनंद साजरा केला. या जल्लोषाचा व्हिडीओ पीटीआय वृत्तसंस्थेने शेअर केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कोण आहे श्रीकांत पांगारकर?
पांगारकर 2001 ते 2006 दरम्यान शिवसेनेचा सदस्य म्हणून जालना नगर परिषदेचा सदस्य होता. 2011 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर हिंदू जनजागृती समितीत सामील झाला.
दोन प्रकरणात अटक
ऑगस्ट 2018 मध्ये महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपारा येथील बॉम्ब व शस्त्रसाठा प्रकरणात त्याला अटक केली होती. त्यावेळी पांगारकरवर UAPA अंतर्गत गुन्हादेखील दाखल झाला होता. त्यानंतर गौरी लंकेश हत्या प्रकरणातही पांगारकरला कर्नाटक पोलिसंनी ताब्यात घेतले. 4 सप्टेंबर 2024 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटल्यावर त्याने आता जालना महापालिकेची निवडणूक लढवली आणि आता तो विजयी ठरला आहे.
गौरी लंकेश हत्या प्रकरण
पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या करण्यात आली होती. बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हत्येचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते. पत्रकार, लेखक आणि बुद्धिजीवींनी शांततेच्या मार्गाने या हत्येचा निषेध केला होता.
Web Summary : Shrikant Pangarkar, accused in the Gauri Lankesh murder case, won the Jalna Municipal Corporation election as an independent. Previously a Shiv Sena member, he was arrested in 2018 in connection with bomb and arms seizure and the Lankesh murder. He was later granted bail and contested the election.
Web Summary : गौरी लंकेश हत्याकांड के आरोपी श्रीकांत पांगारकर ने जालना नगरपालिका चुनाव निर्दलीय उम्मीदवार के रूप में जीता। पूर्व में शिवसेना सदस्य, उन्हें 2018 में बम और हथियारों की जब्ती और लंकेश हत्या के संबंध में गिरफ्तार किया गया था। बाद में उन्हें जमानत मिली और उन्होंने चुनाव लड़ा।