शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

जालना बाजार समालोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

(संजय लव्हाडे) जालना : अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, गहू, ज्वारी, हरभरा, तसेच मोसंबी, डाळिंब, ...

(संजय लव्हाडे)

जालना : अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, गहू, ज्वारी, हरभरा, तसेच मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, टरबूज, आंबे यांना फटका बसला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ग्राहकी अत्यल्प आहे. सटोडियांमुळे सर्व प्रकारचे खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे.

नवीन हरभरा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये येत असल्यामुळे हरभऱ्याची विक्री नाफेडने तूर्त बंद केली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्राच्या विविध भागांत हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तात्पुरती मंदी येऊ शकते. मात्र, नंतर यात तेजीची शक्यता नाकारता येणार नाही. जालना बाजारपेठेत हरभऱ्याची दररोज ४ हजार पोती आवक होत असून, १०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ४४०० ते ४६२५ रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

सध्या जागतिक बाजारपेठेत सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल, सरसो तेल आणि पामतेलाच्या दरात विक्रमी तेजी आहे. मागील २-३ दिवसांत सर्व प्रकारच्या तेलांमध्ये मंदी आलेली दिसत होती. कमी भावात आलेले तेल विक्री करण्यावर सटोडियांचा जोर होता. त्यामुळे तेलांत मंदी आली होती. आता विक्री पूर्ण झाल्यानंतर सटोडियांनी तेलाची खरेदी केली असून तेलांवर आपली पकड पुन्हा मजबूत केली आहे. त्यामुळे तेलांच्या दरात सोमवारी पुन्हा तेजी येण्याची दाट शक्यता आहे.

सध्या तेलबियांचा अधिकाधिक वापर हा बायोडिझेल तयार करण्यासाठी होत असल्यामुळे खाद्यतेलासाठी तेलबियांची टंचाई जाणवत आहे आणि त्यामुळेच खाद्यतेलांचे दर आकाशाला भिडले आहेत, असे मत एका जाणकाराने व्यक्त केले. सध्या सोयाबीन तेल १३४००, सरकी तेल १३५००, पामतेल १३०००, सूर्यफूल तेल १८०००, शेंगदाणा तेल १५६०० आणि करडी तेलाचे दर १७५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

यावर्षी भारतात तुरीचे उत्पादन कमी असून, सणासुदीच्या दिवसांमध्ये तुरीला मोठी मागणी आहे. त्यामुळे मोजांबिक देशातून २ लाख टन तूर आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ही तूर येण्यास ३ ते ४ महिने लागतील. म्हणजे मोजांबिकमधील तूर भारतीय बाजारपेठेत जुलै महिन्यात येऊ शकते. तोपर्यंत तुरीचे दर हे वधारलेलेच राहतील. सध्या जालना बाजारपेठेत तुरीची आवक दररोज ३०० पोती होत असून, २०० रुपयांच्या मंदीनंतर भाव ६४०० ते ६७५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

चौकट

यंदा गाठ्यांची बाजारपेठ थंडावलेलीच

येत्या २८ तारखेला होळीचा सण आहे. होळीनिमित्त साखरेच्या गाठ्या जालना बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाठ्या अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. भाव ४८०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.

---------------------------

सोने, चांदीच्या दरात ५०० रुपयांची तेजी आली असून, सोने ४६८०० रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर ६९५०० रुपये प्रति किलो असे आहेत. पुढील महिन्यात लग्नसराई असल्यामुळे सोने, चांदीच्या दरात तेजी येईल, असे सराफांना वाटते.

गव्हाचे दर १६५० ते २३००, ज्वारी १४०० ते ३५००, बाजरी १२०० ते १५००, सोयाबीन ५३०० ते ५४००, उडीद ४००० ते ६५००, काबुली चना ४४०० ते ७४००, मूग ४००० ते ६५००, गूळ २५०० ते ३१००, साखर ३२५० ते ३४००, हरभरा डाळ २८०० ते ६०००, तूर डाळ ९००० ते १००००, मूग डाळ ८००० ते १००००, उडीद डाळ ८५०० ते १०५००, मसूर डाळ ६००० ते ७०००, शेंगदाणा ८५०० ते १०५०० आणि साबुदाण्याचे दर ४५०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.