शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

जालना जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४१ अंशांच्या वरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:50 AM

विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सावली देणारे वृक्ष जमीनदोस्त झाल्याने तापमानाचे चटके अधिक वाढत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एककीडे १३ कोटी वृक्ष लागवडीचा दावा केला जात आहे. असे असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरूच आहे. लावलेले वृक्ष जगविण्यासाठी कुठलीच प्रभावी यंत्रणा उभारण्यात शासनाला यश आले नाही. त्यामुळे वृक्षलागवड एक सोपस्कार बनली आहे. यामुळेच शहरासह ग्रामीण भागातील वन आच्छादित जमिनीचा टक्का लोप पावत आहे. विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सावली देणारे वृक्ष जमीनदोस्त झाल्याने तापमानाचे चटके अधिक वाढत आहेत.गेल्या तीन महिन्यांचा जालना जिल्ह्याचा वाढत्या तापमानाचा आढावा घेतला असता साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासुनच उन्हाचे चटके वाढत गेले. यामुळे यंदा कधी नव्हे तो उन्हाळा जालनेकरांना असह्य झाला. या उन्हामुळे शीतपेयांच्या विक्रीसह कूलर, एसी, पंखे यांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.एकूणच हा उन्हाळा बाजारपेठेसाठी मात्र दिलासादायक ठरला. असे म्हणल्यास वावगे ठरू नये. उन्हाळ्याची चाहूल ही संक्रांतीनंतर हळूहळू सुरू होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच जालना जिल्ह्याचा पारा हा २८ अंशांच्यावर सरकला होता. मार्चमध्ये हा पारा ३५ ते ४० अंशच्या दरम्यान दिसून आला. परंतु, एप्रिलच्या प्रारंभापासूनच उन्हाच्या कडाक्याने जोर धरला. १ एप्रिलनंतर तर जालन्याचा पारा हा ४० ते ४३ अंश या दरम्यान राहिला. मध्यंतरी उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत बाजारपेठेत शुकशुकाट दिसून यायचा. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असत.उन्हाळ्याचा सर्वात मोठा फटका ज्याप्रमाणे माणसांना बसला; त्यापेक्षा कितीतरी अधिक फटका हा मुक्या प्राण्यांना बसला. तीव्र उन्हामुळे पाणवठे आटल्याने हरीण, वानर हे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर आले आहेत. काही गावांमध्ये तर मोर आणि पोपट तसेच अन्य पक्ष्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. परंतु, त्याची कुठे नोंद नसल्याने हा प्रश्न दुर्लक्षित राहिला. उन्हाचा फटका पिण्याच्या पाण्यालाही बसला. बाष्पीभवनाचे प्रमाण अधिक वाढल्याने आहे ते जलसाठेही कोरडे पडले आहेत.वाढत्या उन्हाचा फटका माणसं, जनावरे यांना बसतोच बसतो. परंतु, शेती आणि फळबागांनाही या उन्हामुळे मोठा ताण सहन करावा लागतो. कृषी विज्ञान केंद्रात वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तापमानाची दररोज नोंद ठेवली जाते.एप्रिलनंतर १५ मे पर्यंत सरासरी ४५ दिवसातील तापमानाचा आढावा घेतल्यास या दिवसात एखादा दोन दिवस वगळता तापमानाचा पारा हा ४० अंशांवर राहिला असल्याची माहिती कृषी अभियंता पंडित वासरे यांनी दिली.

टॅग्स :Sun strokeउष्माघातTemperatureतापमानweatherहवामानenvironmentवातावरण