जालन्यात वेडसर व्यक्तीने ६ कि़ मी. पळविला ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 03:12 PM2019-07-13T15:12:21+5:302019-07-13T15:16:04+5:30

पोलिसांनी दोन तासांनंतर घेतले ट्रकसह ताब्यात

In Jalna, a crazy person who drives 6km truck on Jalana-Aurangabad Highway | जालन्यात वेडसर व्यक्तीने ६ कि़ मी. पळविला ट्रक

जालन्यात वेडसर व्यक्तीने ६ कि़ मी. पळविला ट्रक

Next
ठळक मुद्दे१८ टायरचा ट्रक चोरी झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली टोलनाक्यावर घातली हुज्जत

जालना : शहरातील एका ट्रान्सपोर्टसमोर उभा असलेला ट्रक वेडसर व्यक्तीने जालना -औरंगाबाद या महामार्गावर पळविल्याने खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.    दोन तासांनंतर पोलिसांनी नागेवाडी येथून या वेडसर व्यक्तीला ट्रकसह ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोठा अनर्थ टळला.

१८ टायरचा ट्रक चोरी झाल्याची तक्रार कोहिनूर ट्रान्सपोर्टच्या मालकांनी फोनवर केली. कदिम पोलिसांनी तात्काळ सर्व पोलीस ठाण्यांना वायलेसवर माहिती देऊन शोध घेण्याचा सूचना केल्या. चंदनझिरा पोलिसांना औरंगाबाद रोडवर पेट्रोलिंग करीत असतांना एक इसम भरधाव वेगाने वेडी-वाकडी वळण घेत ट्रक चालवत औरंगाबादच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. नागेवाडी इंजिनिरीग कॉलेजजवळ तो ट्रक रोडच्या बाजूला फसलेला पोलिसांना दिसून आला. सदर इसम तो काढण्यासाठी जोराने रेस करताना आढळल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधल्यानंतर तो वेडसर असल्याचे त्यांनी सांगितले.  या घटनेत पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

टोलनाक्यावर हुज्जत
सदर व्यक्ती ही ट्रक घेऊन औरंगाबादकडे जात होती.   चंदनझिरा परिसरातील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टोल  फाडण्याचे सांगितल, परंतु, त्या व्यक्तीकडे पैसे नसल्याने त्यांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी तासभर हुज्जत घातली. 
 

Web Title: In Jalna, a crazy person who drives 6km truck on Jalana-Aurangabad Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.