थंडीने गारठला जालना जिल्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 01:04 IST2018-12-30T01:03:51+5:302018-12-30T01:04:18+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून, हा जोर आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.

थंडीने गारठला जालना जिल्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असून, हा जोर आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. थंडीच्या या कडाक्यामुळे सकाळी कार्यालयीन कामासाठी बाहेर पडणारे नागरिक, शाळेत जाणारे विद्यार्थी, बाजार समितीत भाजीपाला विक्रीस आणणाऱ्या शेतकºयांना हुडहुडी भरत आहे.
मागील आठवड्यात थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र दोन दिवसांपासून थंडीने पुन्हा जोर धरल्याने शहर गारठले आहे. शनिवारी शहरात कमाल तापमानाची २५.७ तर किमान ९ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
टेंभुर्णीचा पारा ७ अंशावर
टेंभुर्णी मागील दोन दिवसांपासून परिसरात थंडीचा प्रचंड कडाका वाढला असून शनिवारी सकाळी टेंभुर्णीचे तापमान ७ अंशापर्यंत खाली घसरले होते.
दरम्यान कमालीच्या थंडीने जनजीवन पुर्णत: विस्कळीत झाले आहे.