शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूची विहीर! नियंत्रण सुटल्यानं कार थेट विहिरीत; दोन दिवसांत दोन अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 11:38 IST

जालन्यात कार विहिरीत कोसळून मायलेकींचा मृत्यू; अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची मागणी 

जालना: जामवाडी येथे कारचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसापूर्वीच घडली होती. त्यानंतर आज (रविवारी) पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास कारचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून मायलेकींचा मृत्यू  झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

आरती गोपाल फांदडे (३०) व माही गोपाल फांदडे (४ रा. सिंगडोह ता. मानोरा जि. वाशीम) या माय-लेकीचा या अपघातात मृत्यू झाला. तर गोपाल विठ्ठल फादडे (३५ रा. सिंगडोह ता. मानोरा जि. वाशीम), वेदिका फादडे (दीड वर्ष), जय गुणवंत वानखेडे (१७ रा. देवठाणा ता. मानोरा जि.वाशिम) हे तिघे गंभीर जखमी झाले. वाशीम जिल्ह्यातील फादडे कुटुंबिय रविवारी पहाटेच्या सुमारास एका कारमधून औरंगाबाद- देऊळगाव राजा मार्गावरून जात होते. त्यांची कार जामवाडी शिवारात आली असता समोरून अचानक एक ट्रक कारच्या दिशेने आला. त्यामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून गोपाळ फादडे, वेदिका फादडे, जय वानखेडे या तिघांना विहिरीबाहेर काढले. या अपघातात आरती फादडे व त्यांच्या चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. जखमींवर जालना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत एक कार पडल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.जामवाडी येथे रस्त्याच्या शेजारीच एक विहीर आहे. रस्ता वळणदार असल्यानं या भागात असलेली विहीर धोकादायक बनली आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानंतर अपघात होऊन वाहन विहिरीत कोसळत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अपघात रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.