भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:42 IST2025-12-21T13:40:42+5:302025-12-21T13:42:45+5:30
भोकरदन नगरपरिषदेसाठी गेल्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले होते. आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. येथे भाजपाच्या आशा माळी मैदानात होत्या. त्यांचा पराभव करत राष्ट्रवादी (SP) समरीन मिर्झा यांनी 830 मातांनी विजय मिळवला.

भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या?
राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कंबर कसून मैदानात उतरले होते. दरम्यान आता जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपरिषदेचा निकाल समोर येत आहे. येथे दानवे पिता-पुत्रांना अर्थात माजी खासदार रावसाहेब दानवे आणि त्यांचे पुत्र तथा भोकरदन तालुक्याचे आमदार संतोष दानवे यांना मोठा धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस (SP)च्या समरीन मिर्झा 830 मातांनी विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर, दानवेंच्या घराबाहेर राषट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आतषबाजी केली.
भोकरदन नगरपालिका -
भोकरदन नगरपरिषदेसाठी गेल्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले होते. आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. येथे भाजपाच्या आशा माळी मैदानात होत्या. त्यांचा पराभव करत राष्ट्रवादी (SP) समरीन मिर्झा यांनी 830 मातांनी विजय मिळवला. विजयी नगर सेवकांचा विचार करता, या नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसला ९, भाजपाला ९ तर काँग्रेसला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.
दानवे पिता-पुत्रांना धक्का -
खरे तर, जालना जिल्ह्यातील भोकरदन हा माजी मंत्री तथा जालन्याचे तब्बल पाच टर्म खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याशिवाय, त्यांचे पुत्र संतोष दानवे हे गेल्या तीन टर्मपासून भोकरदनचे आमदार आहेत. यामुळे हा निकाल दानवे पिता-पुत्रांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी, लोकसभा निवडणुकीतह कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना धक्का दिला होता.
या निकालांना विशेष महत्व -
दरम्यान, साधारणपणे गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्तानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानंतर आता होत आहेत. यांपैकी राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. ज्याचे निकाल आज जाहीर होत आहेत. महत्वाचे म्हणजे, राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर या निवडणुका पार पडल्या. यामुळे यांच्या निकालांनाही विशेष महत्त्व आहे.