जालन्यात युवकाची झोपेतच केली निर्घृण हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:14 IST2019-05-15T19:13:44+5:302019-05-15T19:14:55+5:30

युवकाचे आईवडील शेजारच्या घरात झोपण्यास गेले होते

In Jalana youth murdered at Ramkheda | जालन्यात युवकाची झोपेतच केली निर्घृण हत्या 

जालन्यात युवकाची झोपेतच केली निर्घृण हत्या 

जालना : घरात झोपलेल्या एका युवकावर धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली.  संतोष हनुमान कुरधने (२२) असे मयताचे नाव आहे.

मूळचे नंदापुर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब १०  वर्षांपासून रामखेडा येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झालेले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते. स्वत:च्या घरात एकटात झोपलेल्या संतोष कुरधनेचा डोक्यात वार करून खून करण्यात आला. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली. यामुळे घटनास्थळी बघ्यानी गर्दी केली होती.

घटनास्थळी  पोलीस अधीक्षक एस. चैतन्य. अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,एडीसचे  यशवंत जाधव, यांच्यासह बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

या तरुणावर काही दिवसापूर्वि अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. तेंव्हा बदनापूर पोलीस ठाण्यात ३०७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. यामुळे खून कोणत्या करणामुळे करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहे.मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आला आहे.

Web Title: In Jalana youth murdered at Ramkheda