शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'मुलीला वाचवण्यासाठी आईने पाण्यात झोकून दिले, पण..."; माय-लेकीच्या मृत्यूने भोकरदन सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 20:15 IST

जालना जिल्ह्यातील पंढरपूर वाडीत कपडे धुताना घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग

भोकरदन (जि. जालना): तालुक्यातील पंढरपूर वाडी येथे शुक्रवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. गावालगत असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय विवाहिता आणि त्यांच्या १२ वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोटच्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मातेनेही आपले प्राण गमावल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुलीला वाचवताना आईने घेतली उडीमिळालेल्या माहितीनुसार, कावेरी दशरथ मोहिते (३०) आणि त्यांची मुलगी सोनाली दशरथ मोहिते (१२) या दोघी शुक्रवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी खदानीवर गेल्या होत्या. कावेरी मोहिते कपडे धुण्यात मग्न असताना, सोनालीचा पाय घसरला आणि ती खोल पाण्यात पडली. आपल्या मुलीला बुडताना पाहून आई कावेरी यांनी क्षणाचाही विचार न करता तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि खदान खोल असल्याने दोघींचाही बुडून मृत्यू झाला.

गावावर शोककळाघटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक प्रकाश तायडे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलीस पोहोचेपर्यंत दोघींचीही प्राणज्योत मालवली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पंढरपूर वाडी गावात शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother Dives to Save Daughter, Both Drown; Village Mourns

Web Summary : In a tragic incident near Bhokardan, a mother and daughter drowned in a quarry. The mother jumped in to save her daughter who had fallen in. Both died, leaving the village in mourning. Police are investigating the incident.
टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीdrowningपाण्यात बुडणे