Jalana: सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे घरफोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 23:05 IST2023-05-27T23:05:06+5:302023-05-27T23:05:24+5:30
Crime News: घरी कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून चक्क सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडल्याची घटना जालना शहरातील चौधरीनगर भागात शनिवारी उघडकीस आली. चोरट्यांनी ६४ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

Jalana: सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे घरफोडले
जालना - घरी कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून चक्क सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडल्याची घटना जालना शहरातील चौधरीनगर भागात शनिवारी उघडकीस आली. चोरट्यांनी ६४ हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
सपोउपनि रविंद्र सखाराम चव्हाण (40) हे जालना पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सपोउपनि रविंद्र चव्हाण यांनी चौधरीनगर येथे किरायाने घर घेतले. त्यांचे जुने घर शंकर जिन येथे असल्याने ते अधूनमधून जुन्या घरी जात असतात.
22 मे रोजी चव्हाण हे जुन्या घरी गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शनिवारी सकाळी घरात चोरी झाल्याचे कळताच चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.