Jalana: सरणावरून सरसकट कर्जमाफीची मागणी; शेतकऱ्यांचे स्मशानभूमीत अनोखे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:17 IST2025-04-15T13:16:33+5:302025-04-15T13:17:36+5:30
सरसकट कर्जमाफीसाठी बदनापूर तालुक्यातील मौजे केळीगव्हाण येथे शेतकऱ्यांचे आंदोलन

Jalana: सरणावरून सरसकट कर्जमाफीची मागणी; शेतकऱ्यांचे स्मशानभूमीत अनोखे आंदोलन
- संतोष सारडा
बदनापूर ( जालना) : सरसकट कर्जमाफीसाठी तालुक्यातील मौजे केळीगव्हाण येथे शेतकऱ्यांनी आज सकाळपासून स्मशानभूमीत अनोखे आंदोलन सुरू केले. शेतकरी कारभारी मसलेकर यांनी स्मशानभूमीत स्वतःची चिता रचून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली.
महायुती शासनाने त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी सुरू आहे. याबाबत आज सकाळपासून शेतकरी कारभारी मसलेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केळीगव्हाण येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील स्मशानभूमीत अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केले आहे. यावेळी मसलेकर यांनी स्वतःचे सरण रचून त्यावर बसून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली.
आंदोलनात ऋषिकेश थोरात, किशोर मदन, भरत मदन, सोपान काळे, तुळशीराम मदन, अतुल मदन, संभाजी मदन, कैलास मदन, सोमीनाथ मदन, अंकुश पवार, सुभाष मदन, दत्तू मदन, कल्याण नाना मदन, शिवाजी पैलवान मदन, पंडितराव मदन, शिवाजी मदन, रावसाहेब सुरवसे, रमेश मदन, सोपान मदन, दीपक मदन, निवृत्ती मदन, ज्ञानेश्वर मदन, संदीप मदन, बाबासाहेब मदन, बाबुराव मदन, जिजा शेंडे, दत्तू मदन, निवृत्ती गायके आदी शेतकरी, ग्रामस्थ व महिलांचा देखील सहभाग आहे.