शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात पेट्रोल पंप चालकास बेदम मारहाण; १००० लिटर डिझेल देण्यास नकार दिल्याने राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 12:29 IST

जालन्यात डिझेल टंचाईचा भडका! १००० लिटर डिझेल मागितले, पंप चालकाने नकार देताच बेदम मारहाण; पहा काय घडलं.

जालना: डिझेलची अभूतपूर्व टंचाई जाणवत असतानाच जालन्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जास्तीचे डिझेल देण्यास नकार दिल्याने जालना तालुक्यातील वानडगाव येथील एका पेट्रोल पंप चालकाला दोन व्यक्तींनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना काल रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

सध्या राज्यात सर्वत्र डिझेलचा तुटवडा असताना, मर्यादेपेक्षा जास्त इंधन देण्यावरून वाद विकोपाला जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. राहुल उगले असे मारहाण झालेल्या पेट्रोल पंप चालकाचे नाव आहे.

१००० लिटर डिझेलची अवाजवी मागणीमिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास दोन व्यक्तींनी वानडगाव येथील पेट्रोल पंपावर येऊन एकदम १,००० लिटर डिझेलची मागणी केली. सध्याची डिझेल टंचाई आणि उपलब्ध साठा पाहता पंप चालक राहुल उगले यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल देण्यास असमर्थता दर्शवली. त्यांनी नियमानुसार इंधन देण्याचे सांगितल्याने वादाला सुरुवात झाली.

पंप चालकावर हल्ला आणि पोलिसांत धावइंधन मिळत नसल्याच्या रागातून त्या दोघांनी राहुल उगले यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी चालकास बेदम चोप दिला. या घटनेनंतर पीडित चालकाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत संरक्षणाची आणि न्यायाची मागणी केली आहे.

तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखलया धक्कादायक प्रकारानंतर जालना तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सध्या याप्रकरणी 'अदखलपात्र' (NC) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे पेट्रोल पंप चालकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत. येत्या काळात पेट्रोल पंपांवर पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna: Petrol pump owner beaten for refusing excess diesel.

Web Summary : In Jalna, a petrol pump owner was assaulted for refusing to provide 1000 liters of diesel amidst scarcity. Police filed a case, sparking outrage among pump owners and raising security concerns.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाFuel Crisisइंधन टंचाई