शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

Jalana: अपघातात मुलाचा जागीच मृत्यू; वारी अर्धवट सोडून गावी परतलेल्या आईने फोडला टाहो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:02 IST

विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीत गेलेली आई सावळ्याच्या दर्शनाविनाच आली माघारी

राजूर/मानदेऊळगाव : शिक्षणानिमित्त घरापासून दूर राहणाऱ्या मुलाला रुग्णालयात भेटण्यासाठी जाणाऱ्या वडिलांचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.४० वाजता राजूर-जालना रोडवरील तुपेवाडी आश्रमासमोर घडली. आण्णा उर्फ दत्ता चंद्रकांत चापाईतकर (वय ३९, रा. देळेगव्हाण, ता. जाफराबाद) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीसोबत पंढरीकडे गेलेल्या आईने वारी अर्धवट सोडून गावाकडे धाव घेतली. शुक्रवारी गावात अंत्यसंस्कारासाठी परत आल्यानंतर मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी एकच हंबरडा फोडला. अरे माझ्या वाघा आता परत येरे... अशी आर्त साद घातली. यावेळी आईचा हंबरडा ऐकून कुटुंबीयांसह उपस्थितांनी एकच आक्रोश केला.

जाफराबाद तालुक्यातील देळेगव्हाण येथील आण्णा उर्फ दत्ता चंद्रकांत चापाईतकर (वय ३९) यांचा मुलगा जालन्यापासून जवळच खरपुडी गावात शिक्षणासाठी राहत होता. दरम्यान, गुरुवारी मुलाचा हात फ्रॅक्चर झाला असून तो जालना येथील एका खासगी रुग्णालयात भरती असल्याची माहिती दत्ता यांना मिळाली. यामुळे गुरुवारी रात्रीच ९.२० वाजता देळेगव्हाण गावातून मुलाला पाहण्यासाठी दत्ता यांनी दुचाकीवरून जाण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, राजूर-जालना रोडवरील तुपेवाडी आश्रमाजवळ येताच चालकाने रस्त्याच्या मधोमध उभ्या केलेल्या एका ट्रक (एमएच-२१-बीएच-९६७७) ला पाठीमागून त्यांची दुचाकी जाऊन धडकली. यात ते जागेवरच बेशुद्ध पडले. 

या घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी येऊन त्यांना तत्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डाॅक्टरांनी त्यांना तपासून गुरुवारी रात्री १० वाजता मृत घोषित केले. यावेळी प.पु. खडेश्वरी बाबा यांनी अपघातस्थळी येऊन नागरिकांच्या सहकार्याने मदत केली. चंदनझिरा पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता शवविच्छेदन केले. त्यानंतर डॉक्टरांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता देळेगव्हाण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, भावजया, पुतण्या असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालना