अंबड (जि. जालना): अंबड शहरातील चक्री चौक परिसरात असलेल्या 'राघव ज्वेलर्स' या सराफा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी १५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१३ जानेवारी) पहाटे २:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.
असा झाला चोरीचा थरार मिळालेली माहिती अशी की, विनोद गोविंदराव चित्राल यांचे चक्री चौकात ज्वेलर्सचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर तीन अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील ८० ग्रॅम सोन्याचे दागिने (झुंबर, फुल, पेंडल्स), दोन किलो चांदीचे जोडवे, एक किलो चांदीच्या अंगठ्या, ५०० ग्रॅम चांदीच्या साखळ्या आणि १२ हजार रुपयांची रोकड असा एकूण १५ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी अवघ्या काही वेळात लंपास केला. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पोलीस तपासाला वेगदुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षकाने तात्काळ मालक विनोद चित्राल यांना माहिती दिली. चित्राल यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात 'भारतीय न्याय संहिता' कलम ३०५ आणि ३११(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुरले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, व्यापाऱ्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Web Summary : Thieves struck Raghav Jewelers in Ambad, Jalana, stealing gold and silver worth lakhs. The incident, captured on CCTV, occurred early Tuesday, causing alarm among local merchants. Police are investigating.
Web Summary : जालना के अंबड में चोरों ने राघव ज्वेलर्स में सेंध लगाकर लाखों के सोने-चांदी के गहने चुरा लिए। सीसीटीवी में कैद हुई घटना से व्यापारियों में दहशत है। पुलिस जांच कर रही है।