स्टेरिंग जाम झाल्याने जाफराबाद-चिखली बस उलटली; चालक, वाहकासह पंधरा प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:16 IST2024-12-24T17:16:08+5:302024-12-24T17:16:46+5:30
जाफरबाद येथून सकाळी चिखलीला जाताना कोळेगाव पाटीजवळ झाला अपघात.

स्टेरिंग जाम झाल्याने जाफराबाद-चिखली बस उलटली; चालक, वाहकासह पंधरा प्रवासी जखमी
जाफराबाद : चिखली आघाराची बस जाफराबाद येथून वरुड बुद्रुक मार्गे प्रवासी घेऊन चिखलीला जात असताना कोळेगाव पाटीजवळ घाट रस्ता चढत असताना अचानक बसची स्टेरिंग जाम होऊन चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला जवळपास वीस फूट खाली पडून पलटी झाली आहे.बस मध्ये बसलेले जवळपास १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे.
बस क्रमांक एमएच १४ बी.टी,०६४७ मधील जखमीना चिखली येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक देव पवार यांनी दिली आहे.सुदैवाने काही जिवीत हानी झाली नसून जखमी मध्ये बस चालक संजय सोळंके जखमी होऊन किरकोळ मार लागलाआहे.वाहक सुषमा गवई यांना मुक्का मार तर प्रवासी छाया राहुल हिवाळे, विष्णू साळवे,भिकाबाई लक्समण शेळके,मंदा परसराम सोरमारे, सय्यद युनूस सय्यद इसा, ताई अंबादास भोरे, यमुनाबाई बाबुराव शेळके, मंगला राजू मोरे, दिलीप शंकर फटाले, मानसीगं आनंदा परिहार, साहेबराव त्र्यंबक बोऱ्हाडे,मन्सूरखा पठाण हे किरकोळ जखमी झाले आहे.
अपघात झालेल्या बसची अवस्था पाहता मोठी घटना घडली असावी असे प्रथम दर्शनी दिसून येते.मात्र मोठा अनर्थ टळला आहे.जाफराबाद पोलिसांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा केला केला आहे.दुपार पर्यंत चिखली बस आगाराचे कोणी प्रतिनिधी आले नसल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.