दिवसभरात विकतो फक्त अडीचशे रूपयांचाच भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:35 IST2018-11-26T00:35:15+5:302018-11-26T00:35:21+5:30
दिवसभरात फक्त मेथीच्या भाजी विक्रीतून केवळ २५० रूपये हाती येतात. त्यामुळे ठोक पाच- पन्नास रूपयात व्यापाऱ्यांना स्वस्तात दिलेला भाजीपाला परवडतो. अशी आपबिती अंकुश पांडुरंग सांगळे (मालेगाव खुर्द) या शेतकºयाने सांगितली आहे.

दिवसभरात विकतो फक्त अडीचशे रूपयांचाच भाजीपाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दिवसभराची चांगली कमाई तरी होईल, या आशेने दिवसभर ऊन डोक्यावर घेऊन भाजी टवटवीत दिसावी, यासाठी अधून- मधून त्यावर पाण्याचा शिपका मारूनही दिवसभरात फक्त मेथीच्या भाजी विक्रीतून केवळ २५० रूपये हाती येतात. त्यामुळे ठोक पाच- पन्नास रूपयात व्यापाऱ्यांना स्वस्तात दिलेला भाजीपाला परवडतो. अशी आपबिती अंकुश पांडुरंग सांगळे (मालेगाव खुर्द) या शेतकºयाने सांगितली आहे.
शहरातील गांधीचमन येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. येथे परिसरातील गावातील शेतकरी भाजीपाला थेट विक्रीसाठी आणतात. रविवारी येथे ग्राहकांअभावी बाजारपेठ थंड होती. दुष्काळातही भाजीपाल्याची आवक जैसी थेच आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर सध्या स्थिर आहेत. बाजारात सायंकाळी फेरफटका मारताना सांगळे यांनी सांगितले की, मेथीची भाजी व्यापारी सध्या ठोक दराने १५० रू. शेकडा घेतात. पण, त्यांना न देता आज दिवसभर बाजारात बसून ती फक्त २५० रूपयांनाच विकली आहे. शनिवारी दिवसभर कुटुंबातील तीन व्यक्तीने ही भाजी काढली होती.
अनेक व्यापारी शेतक-यांकडून ठोक दराने कमी किंमतीत जास्त भाजीपाला खरेदी करून विक्रीसाठी बसतात. त्यांच्याकडे जास्त भाजीपाला असल्यामुळे त्यांना दिवसभरात चांगली कमाई होते. पण, शेतकरी थोडाच भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येतात. यामुळे त्यांना दिसभरात कमी कमाई होते.