परतूर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:38 IST2019-06-06T00:37:53+5:302019-06-06T00:38:05+5:30
तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे.

परतूर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालूक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली असून, टँकरची संख्या २५ वर पोहोचली आहे.
वाढलेली उन्हाची तिव्रता यामुळे जलसोठे कोरडे होत आहेत. पाणी पातळी खालावल्याने विहरी,बोअर घेवूनही पाणी लागेनासे झाले आहे.ग्रामिण भागातून टँकरचे प्रस्ताव येवू लागले आहेत.
सद्या २५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये शेवगा, काºहाळा, सुरूमगाव, परतवाडी, खांडवीवाडी, ढोकमाळतांडा, लिखीत पिप्री, बामणी, शिंगोना, सिरसगाव, ब्राम्हणवाडी, पाटोदा माव, वलखेड, खांडवी, वाटूर फाटा, कावजवळा, एदलापूर, वाहेगाव सातरा,पांडेपोखरी, टाकळी रंगोपंत, मसला, लिंगसा, वाघाडी वाडी, मापेगाव बू. आष्टी या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. हा पाणी पुरवठाही तुटपंजा असल्याने गावातील महिला, लहान मुलेही पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे चित्र दिसून येते.
खांडवीत पाणीटंचाई
या गावात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. या दोन्ही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या भागात रोजगार हमीची कामे सुरू आहेत. मजूर सकाळी कामावर व नंतर पाण्याच्या शोधात अशी मजुरांची दुहेरी फजिती होत आहे.
महिला, चिमुकलेही पाण्यासाठी भटकंती करतानाचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. ऐन पावसाळयाच्या तोंडावर पाणी टंचाईचे चित्र गडद होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.