शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:20 IST

लघु उद्योगांमध्ये वेगवेगळा कच्चा माल मोठ्या उद्योगांना पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

ठळक मुद्देलघु आणि मोठ्या उद्योगाची चाके वेगातजालना येथे नवीन आणि जुनी अशा दोन औद्योगिक वसाहती आहेत.

जालना : कोरोना महामारीमुळे एकुणच मानवी जीवनासह औद्योगिक क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे. आता परिस्थितीत हळूहळू बदल होत असून कोराेनाची रुग्णसंख्या घटत आहे. कोरोनाचा मोठा फटका उद्योग क्षेत्राला बसला होता. लॉकडाऊनमुळे उद्योगाची चाके तीन महिने बंद होती. 

जालना जिल्ह्याचा विचार केला असता हा जिल्हा पूर्वीपासूनच व्यापार आणि उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहे. जालना शहरात बियाणे, स्टील, दालमील, सॉ - मील तसेच जिनींग उद्योग मोठ्या प्रमाणावर विकसीत झाला आहे. आजघडीला सर्वात जास्त स्टील उद्योग येथे विकसीत झाला आहे. आज देशातील बहुतांश राज्यांमधील प्रकल्पांसाठी जालन्याचे स्टील उपयोगात आणले जाते. बियाणे उद्योगानेही मोठी भरारी मध्यतंरी घेतली होती. परंतु, आज काही बोटावर मोजण्या एवढ्या कंपन्या कार्यरत आहेत. 

शासनाचे धोरण देखील बियाणे उद्योगांना संशोधनासाठी पुरक नसल्याने इतर राज्यांमध्ये येथील उद्योजकांनी आपले संशोधन आणि विकास वाढविला असल्याचे दिसून येते. या उद्योग क्षेत्रासाेबतच जालन्यातील भुसार मालाची व्यापारपेठही मोठी आहे. या व्यापार पेठेलाही कोरोनामुळे फटका बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उद्योगांची चाके पुन्हा गतीने फिरु लागली आहेत. जालन्यातील विविध उद्योगांमध्ये बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथील कामगार आहेत. कोरोनामुळे ते त्यांच्या गावी गेले होते. ते आता पुन्हा कामावर रुजू झाले असल्याने आता कामगारांची टंचाई दूर झाली आहे. 

जिल्ह्यात 1000 कोटींचा फटका जिल्ह्यातील सर्वात मोठा उद्योग असलेल्या स्टील उद्योगाला 250 ते 300 कोटींचा फटका बसला असून अन्य लहान मोठ्या उद्योगांची बेरीज केली असता हे नुकसान 1000 हजार कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आता ही गाडी रुळावर येत आहे.

कुठल्या क्षेत्रात उद्योग सुरू होताहेत ?जालना येथे नवीन आणि जुनी अशा दोन औद्योगिक वसाहती आहेत. यात प्रामुख्याने बियाणे, डाळ मिल, स्टील, प्लास्टिक उद्योगांचा समावेश आहे. लघु उद्योगांमध्ये वेगवेगळा कच्चा माल मोठ्या उद्योगांना पुरविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

किती कामगार स्थानिक व परप्रांतीय ? 9300 स्थानिक / 3700परप्रांतीय : जालना येथील विशेष करुन स्टील उद्योग वगळता अन्य उद्योगांमध्ये स्थानिक कामगार आणि कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. 

स्टील उद्योगाने मोठ्या हिंमतीने कोरोनावर मात करत उत्पादन सुरु केले आहे. परंतु मागणी आणि पुरवठ्याचे गणित अद्याप पूर्वीप्रमाणे जुळले नाही. - अनिल गोयल, उद्योजक

जालना येथील सर्वात मोठा उद्योग म्हणून स्टीलचा उल्लेख करावा लागेल. या क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि शासनाला कररुपी महसूल दिला आहे.- किशोर अग्रवाल, मराठवाडा इंटरप्रिन्युअर्स असो. अध्यक्ष

टॅग्स :JalanaजालनाMIDCएमआयडीसीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक