शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपाची गती वाढवा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून उजाडला असला तरी, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. हा मुद्दा गंभीर असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मनुष्यबळ वाढवून ते वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.गुरूवारी बँकर्सची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून उजाडला असला तरी, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. हा मुद्दा गंभीर असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मनुष्यबळ वाढवून ते वितरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.गुरूवारी बँकर्सची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर यांनी आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या पीककर्जाची माहिती दिली. यावेळी एसबीआय, देना बँक तसेच युनियन बँकसेह अन्य बँकांची पीककर्ज वाटपाची गती ही अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने जास्तीचे मनुष्यबळ वाढवून शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या. तसेच यात दिरंगाई करणा-या बँकांची तक्रार त्यांच्या मुख्यालयाकडे करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिला.यावेळी १८ जून रोजी जिल्ह्यातील आठही तालुक्यात शेतक-यांसाठी कर्ज मिळण्यासाठी मेळावे घेण्याचा निर्णय बैठकीत देण्यात आला.खरीप हंगामासाठी यंदा बाराशे कोटी रूपयांचे पिककर्ज वाटापाचे उद्दिष्ट असल्याचे इलमकर यांनी यावेळी सांगितले.या बैठकीत एसबीआय बँकेचे विभागीय व्यवस्थापकांनी मनुष्यबळ तातडीने वाढण्यात येईल असे सांगितले. बैठकीस जिल्हा सहनिबंधक नारायण आघाव यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक यांच्यासह प्रशासकीय अधिका-यांची उपस्थिती होती.आढावा : उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नांची गरजजालना जिल्ह्याच्या कृषीपत आराखड्यात यंदा खरीप हंगामासाठी एक हजार २४५ कोटी रूपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, आता खरीप हंगाम सुरू झाला असून, आता पर्यंत केवळ दहा टक्के एवढेच कर्जाचे वाटप झाले आहे. शेतकºयांना त्यांच्या हक्काचे कर्ज मिळावे म्हणून यंत्रणेने आळस झटकून करावे, असे जिल्हाधिका-यांनी या बैठकीत सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीgovernment schemeसरकारी योजना