जालन्यात मौल्यवान गौण खनिजाचा अवैध साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:44 IST2018-09-25T18:43:42+5:302018-09-25T18:44:47+5:30

तालुक्यातील दगडवाडी येथे चंदनझिरा पोलीसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकत १६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मौल्यवान गौण खनिज जप्त केले.

The illegal stocks of precious mineral deposited in Jalna | जालन्यात मौल्यवान गौण खनिजाचा अवैध साठा जप्त

जालन्यात मौल्यवान गौण खनिजाचा अवैध साठा जप्त

जालना :  तालुक्यातील दगडवाडी येथे चंदनझिरा पोलीसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकत १६ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मौल्यवान गौण खनिज जप्त केले.

पोलीसांच्या माहितीनुसार, दगडवाडी येथे राहणारा विठ्ठल गाने हा बेकायदेशीरीत्या उत्खनन करुन गारगोटी या गौण खनिजाचा साठा करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. यावरुन अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी चंदनझिरा पोलीसांसह सोमवारी मध्यरात्री दगडवाडी येथे छापा मारला. यावेळी १६ लाख ४० हजार किंमतीचा अवैध साठ जप्त केला. पुढील तपास पोउपनि प्रमोद बोंडले करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक समाधन पवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक सी. जी. गिरासे,  एस. इंगळे,  प्रमोद बोंडळे, कर्मचारी संजय घुसिंगे, अविनाश नरवडे, रमेश वाघ, आटोळे, विशाल काळे, प्रदिप घोडके, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखुरे, अनिल काळे, कृष्णा भंडागे, चालक मच्छिंद्र निकाळजे यांनी केली.
 

Web Title: The illegal stocks of precious mineral deposited in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.