जालन्यात १४०० लिटर रॉकेलचा अवैध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 16:31 IST2018-10-26T16:29:59+5:302018-10-26T16:31:43+5:30
शहरातील मामा चौकातून काळ्या बाजारात जाणारा रॉकेलाचा १४०० लिटर अवैधसाठा पोलिसांनी जप्त केला.

जालन्यात १४०० लिटर रॉकेलचा अवैध साठा जप्त
जालना : शहरातील मामा चौकातून काळ्या बाजारात जाणारा रॉकेलाचा १४०० लिटर अवैधसाठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.
फेरोज खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोकॉ. विशाल काळे, प्रदीप घोडके, ज्ञानेश्वर केदारे, शिवाजी डाखुरे यांनी केली.