शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

...तर बँकेतील पैसे राहणार नाहीत, प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 6:57 PM

सरकार हे झिंगलेल्या लोकांसारखे निर्णय घेत असून, रिझर्व्ह बँकेच्या पैशावरही त्यांनी डोळा ठेवला आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा आले तर तुमचे बँकेतील पैसे गेले म्हणून समजा

जालना - सरकार हे झिंगलेल्या लोकांसारखे निर्णय घेत असून, रिझर्व्ह बँकेच्या पैशावरही त्यांनी डोळा ठेवला. सरकारने बँकेतील एक लाखावरील डिपॉझिटची हमी नाकारली आहे. त्यामुळे हे सरकार पुन्हा आले तर तुमचे बँकेतील पैसे गेले म्हणून समजा, अशी बोचरी टिका, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकावर केली. बेराजगारी, मंदी, आरक्षणासह इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी चळवळीतून आलेल्या लोकांच्या हती सत्ता हावी आणि म्हणूनच आपण वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उभा केल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.जालना शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात शुक्रवारी दुपारी आयोजित बलुतेदार- अलुतेदार सत्ता संपादन निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. यावेळी आंबेडकर यांनी केंद्र, राज्य सरकारवर टिकेची झोड उठविली. सरकारने औद्योगिकीकरण करताना बलुतेदार-आलुतेदारांचा विचार केला गेला नाही. त्यामुळे आज अनेकांचे व्यवसाय मोडीत निघाले असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. संशोधकांनी स्वत:च्या नावाऐवजी बलुतेदार- आलुतेदारांच्या कलेचा विकास व्हावा, यासाठी संशोधन करावे. तसे झाले प्रत्येकाच्या हाताला काम मिळून बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशात टाटा, अंबानी हे नवे सावकार झाले असून, सत्तेत कोणाला बसवायचे हे ते निर्णय घेत आहेत. ही परिस्थिती केवळ बलुतेदार, अलुतेदार, कारागिरांची सत्ता बदलू शकते.कलम ३०७ चा गवगवा करणा-या शासनाने हा निर्णय घेत पाकव्याप्त काश्मिर पाकिस्तानला दान केल्याचा आरोप करीत पाकव्याप्त काश्मिर मिळविण्याचे माध्यम सरकारने कापून टाकल्याचे ते म्हणाले. आपण सत्तेत आल्यानंतर जातीची जनजणना करणे, सरकारी बढतीत आरक्षण लागू करणे, केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत देणे आदी विविध योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव गोविंद दळवे, भिमराव दळे, जिल्हाध्यक्ष दीपक डोके यांच्यासह विविध बारा बलुतेदार, आलुतेदारांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.‘त्या’ टाळीची किंमत कापूस उत्पादक भरणारभाजपावाले आपला टीआरपी वाढविण्यासाठी मोदींनी ट्रम्प यांना टाळी दिल्याचे सांगत प्रचार करीत आहेत. मात्र, अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षानंतर अमेरिकेतील कापूस भारतात विकण्यासाठी ती टाळी होती. ४ हजार रूपये क्विंटलने अमेरिकेचा जिनिंगचा कापूस भारतात आला आहे. त्यामुळे शासनाने कापसाला साडेपाच हजार रूपये क्विंटल दर दिला असला तरी व्यापारी कमी किंमतीत कापूस खरेदी करणार असून, ट्रम्प यांच्या ‘त्या’ टाळीची किंमत देशातील कापूस उत्पादकांना भरावी लागणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.पाणी वाटपाची मांडणी लवकरचमहाराष्ट्रात पाणी कमी नाही. मात्र, पाणी वाटपाचे योग्य नियोजन झालेले नाही. मराठवाडा हा सतत दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. ओल्या भागातील पाणी मराठवाड्यात वळविणे गरजेचे आहे. तसे झाले तर दुष्काळ कायमचा मार्गी लागणार असून, पाणी वाटपाची मांडणी आपण लवकरच करणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले.तर जलील यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावीबाळासाहेब आंबेडकर यांनी डोक्यावर हात ठेवल्याने एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले. जागा आपल्यामुळेच आली असे वाटत असेल तर इम्तियाज जलील यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे खुले आव्हान वंचित बहुजन आघाडीचे डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी यावेळी दिले. गणेश विसर्जनानंतर आता केंद्र, राज्य सरकारला विसर्जित करण्याची वेळ आली असून, समाजातील सर्व घटकांनी वंचितच्या पाठीशी रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBanking Sectorबँकिंग क्षेत्रBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी