अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 13:56 IST2018-04-30T13:56:14+5:302018-04-30T13:56:14+5:30

एदलापूर येथील एका सालगड्याने  पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

Husband stone crushed wife due to the suspicion of immoral relations | अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची दगडाने ठेचून हत्या 

परतूर (जालना ) : एदलापूर येथील एका सालगड्याने  पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रविवारी (दि.२९) रात्री झालेल्या घटनेतील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर रनेर हा एदलापुर शिवारातील एका शेतात सालगडी म्हणून काम करतो. भास्कर पत्नी राधाबाई (४०) सोबत शिवारातच राहायचा. मागील काही दिवसांपासून भास्कर याला पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातच काल रात्री व्यसनाधीन असलेला भास्कर दारूच्या नशेत घरी आला. रात्री बारा वाजेच्या दरम्यान त्याचे पत्नी राधाबाई सोबत कडाक्याचे भांडण झाले. दोघांची झटापट झाली आणि संतापाच्या भरात भास्करने जवळच असलेल्या दगडाने पत्नीवर हल्ला केला. अत्यंत क्रूरपणे भास्कर याने राधाबाईच्या तोंडावर, पाठीत आणि मांडीवर दगडाने वार करणे सुरु ठेवले. यातच राधाबाई यांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोकॉ अन्नासाहेब लोखंडे, शेख इब्राहीम यांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली. याप्रकरणी आरोपी भास्कर यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: Husband stone crushed wife due to the suspicion of immoral relations