भोकरदन : भोकरदन येथे एका विवाह समारंभासाठी येत असताना विरेगाव जवळ एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती व पत्नी ठार झाले आहे.
या घटनेची माहिती अशी की, तालुक्यातील वालसावंगी येथील विष्णू त्र्यंबक गारोडी ( 55 ) हे दुचाकीवरून (एम एच 21 बिके 3596 ) पत्नीसह मंगलबाई विष्णू गारोडी ( 50 ) भोकरदन येथे एका लग्नासाठी येत होते. भोकरदन- जाफाराबाद रोडवर विरेगाव जवळ त्यांच्या दुचाकीला एसटीबसने जोरदार धडक दिली. यात पतीपत्नी गंभीर जखमी झाले. विष्णू गाढे, पोलीस कर्मचारी केंद्रे यांनी जखमींना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना जालना येथे रवाना करण्यात आले. मात्र, त्यांचा जिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला.