बस-टेम्पोची समोरासमोर धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:28 IST2024-12-14T18:28:26+5:302024-12-14T18:28:43+5:30

माहूरगडाकडे जाणारी बस नाव्हा शिवारात आली असता समोरून येणाऱ्या टेम्पोशी जोराची धडक झाली.

Head-on collision between bus and tempo; Two passengers killed, 20 injured | बस-टेम्पोची समोरासमोर धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी

बस-टेम्पोची समोरासमोर धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी

जालना : बस आणि आशयर टेम्पोची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २० प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना जालना तालुक्यातील नाव्हा गावच्या शिवारात शनिवारी दुपारी घडली.

माहूरगडाकडे जाणारी बस नाव्हा शिवारात आली असता समोरून येणाऱ्या टेम्पोशी जोराची धडक झाली. या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, इतर २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातात आयशर आणि बसचा चक्काचूर झाला.

Web Title: Head-on collision between bus and tempo; Two passengers killed, 20 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.