गळ्यातील सोन्याचे डोरले हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:56+5:302021-04-07T04:30:56+5:30
दुकान फोडले ; मुद्देमाल लंपास जालना : भोकरदन येथील श्रीकृष्ण गणपती कॉम्पलेक्समधील लक्ष्मी ड्रेसेस हे दुकान चोरट्यांनी ...

गळ्यातील सोन्याचे डोरले हिसकावले
दुकान फोडले ; मुद्देमाल लंपास
जालना : भोकरदन येथील श्रीकृष्ण गणपती कॉम्पलेक्समधील लक्ष्मी ड्रेसेस हे दुकान चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री फोडले. चोरट्यांनी काऊंटरमधील रोख रक्कम ४० हजार व कपडे चोरून नेले. चोरट्यांनी रोख रक्कम ४० हजारांसह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी छगन बाबुराव दळवी यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल दाभाडे हे करीत आहेत.
भारज खू. येथील ग्रामपंचायतीची मोटार चोरी
जालना : भारज येथील लघुसिंचन प्रकल्पातून ग्रामपंचायतीची मोटार, स्टार्टर व इतर साहित्य चोरीस गेल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी वशिष्ट खरात यांच्या फिर्यादीवरून जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास खार्डे हे करीत आहेत.