रात्री हळद लागली अन पहाटे नवरी आणि प्रियकराने संपवले जिवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 12:34 IST2021-05-16T12:33:27+5:302021-05-16T12:34:25+5:30
स्नेहा राजू आव्हाड आणि नवनाथ सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.

रात्री हळद लागली अन पहाटे नवरी आणि प्रियकराने संपवले जिवन
- फकिरा देशमुख
भोकरदन ( जालना ) : हळदीच्या अंगाने घरातून पलायन करून नवरीने मामाच्या मुलांसोबत गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील मालखेडा येथे उघडकीस आली आहे. स्नेहा राजू आव्हाड आणि नवनाथ सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.
या बाबतची माहिती अशी की, स्नेहा राजू आव्हाड (रा मुबंई) या मुलीचे तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे सोबत विवाह रविवारी 16 मे रोजी दुपारी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह आयोजित करण्यात आला होता. या विवाहसाठी मुलींकडील नातेवाईक कोळेगाव येथे आले होते. शनिवारी 15 मे रोजी रात्री मोठ्या उत्साहात हळदीचा कार्यक्रम झाला. नवरीला व नवरदेवाला हळद लावण्यात आली व रात्री उशिरा सर्व जण झोपी गेले. मात्र, पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान स्नेहा आव्हाड ही तिच्या मामाचा मुलगा नवनाथ सुरेश गायकवाड ( 21 रा मालखेडा हा कोळेगाव ) सोबत मालखेडा येथे आली. येथे सुरेश गायकवाड यांच्या घरात दोघांनी आपण एकत्र जगण्यामरणाची शपथ घेतली आहे असे म्हणत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजाराम तडवी करीत आहेत.
नवरदेव रुग्णालयात
स्नेहासोबत सुखी संसाराचे स्वप्न बघत असलेला नवरदेव शुभम साळवे याला आपल्या भावी पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच त्याची तब्बत खालावली त्यामुळे त्याला तात्काळ भोकरदन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.