गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:30 IST2025-09-21T15:28:10+5:302025-09-21T15:30:59+5:30

Gunratna Sadawarte News: गुणरत्न सदावर्ते जालन्यात असताना काही लोकांनी त्यांच्या कारवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Gunaratna Sadavarte's car attacked, protesters blocked the convoy and ran towards the car | गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

Gunratna Sadawarte Latest News: स्वतंत्र, तसेच ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात होते. ते एका आंदोलनस्थळी जात असतानाच ताफा अडवत त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. 

मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट लागू केले आहे. मराठा समाजातील ज्या व्यक्तींच्या कुणबी असल्याच्या नोंदी आढळतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. पण, गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून विरोध केला जात आहे. 

सातत्याने मनोज जरांगे टीका करणारे आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गुणरत्न सदावर्ते रविवारी (२१ सप्टेंबर) जालन्यामध्ये होते. ते येणार म्हणून पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. 

आंदोलकांनी अचानक कारवर केला हल्ला

गुणरत्न सदावर्ते जालन्यात सुरू असलेल्या धनगर समुदायाच्या उपोषण स्थळी निघाले होते. रस्त्यात आंदोलक उभे असल्याचे बघून पोलीस थांबले. त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हुलकावणी देत लोकांनी सदावर्तेंच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

आंदोलक कारच्या काचेवर जोरात मारत असतानाच पोलीस गेले आणि त्यांनी आंदोलकांना पकडले. त्यानंतरही एक आंदोलक निसटला होता. त्याला परत ताब्यात घेण्यात आले. 

Web Title: Gunaratna Sadavarte's car attacked, protesters blocked the convoy and ran towards the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.