शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्य सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST

वालसावंगी : येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी पॅनल प्रमुखांनी आपापले ...

वालसावंगी : येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी पॅनल प्रमुखांनी आपापले सदस्य सहलीवर पाठविले आहेत. त्यामुळे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी ग्रामपंचायत निवडणूक मोठी चुरशीची झाली. चौपाल विकास पॅनल विरुद्ध भाजपा-राष्ट्रवादीने एकत्रित येत लढा दिला. १७ पैकी दहा सदस्य राष्ट्रवादी-भाजपाचे विजयी झाले. त्यांच्याकडे बहुमत आलेले आहे, तर चौपाल पॅनलचे सात सदस्य विजयी झाले आहेत. त्यांना बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज आहे. त्यात सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे दोन्ही पॅलनकडून सरपंच आमचाच होणार असे सांगितले जात आहे. अनेक नूतन सदस्य सध्या सहलीवर आहेत. एका गटाकडे असलेले बहुमत आणि दुसऱ्या गटाकडे कमी असलेले दोन सदस्य यात सरपंचपद कोणत्या गटाकडे जाणार, ऐन वेळी कोणती राजकीय खेळी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.