आजपासून गोविंदगिरी यांची प्रवचन माला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 00:24 IST2020-03-10T00:23:40+5:302020-03-10T00:24:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : प्रसिध्द संत आचार्य किशोर व्यास ऊर्फ गोविंदगिरी महाराज यांच्या तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन ...

आजपासून गोविंदगिरी यांची प्रवचन माला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रसिध्द संत आचार्य किशोर व्यास ऊर्फ गोविंदगिरी महाराज यांच्या तीन दिवसीय प्रवचन मालेचे आयोजन १० ते १२ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दररोज सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात होणार आहे. यासाठी रोटरी क्लबचा भाग असलेला रोटरी रेनबो क्लबने ही प्रवचन माला आयोजित केली आहे. यामध्ये ‘सफलता के मूलमंत्र, परिवार के स्वर्णिम सूत्र, धर्म और विज्ञान’ असे विषय राहणार आहेत.
प्रवचानाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विष्णू चेचाणी, संजय राठी, रेनबो क्लबचे अध्यक्ष विवेक मणियार, शाम भरतिया, गोपाल मुंदडा, आशिष नावंदर, कैलास तोष्णीवाल, नवनाथ वाघमारे, डॉ. नितीन खंडेलवाल, जयेश पहाडे, स्मिता चेचाणी, संगीता गुप्ता, सोनल मित्तल आदींनी केले आहे. यापूर्वीही गोविंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले आहेत.