गोरक्षनाथ कुमकर यांचा दिवसाढवळ्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 17:37 IST2023-05-07T17:36:50+5:302023-05-07T17:37:04+5:30
गोरक्षनाथ आत्माराम कुमकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन होते.

गोरक्षनाथ कुमकर यांचा दिवसाढवळ्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून
फकिरा देशमुख, भोकरदन (जालना): तालुक्यातील राजूर येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन गोरक्षनाथ आत्माराम कुमकर(रा.राजूर, वय 58) यांचा दिवसाढवळ्या दोन अज्ञात आरोपींनी डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात केला आहे. या घटनेमुळे राजूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर खून जमिनीच्या व प्लॉटिंगच्या वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गोरक्षनाथ कुमकर हे 7 मे रोजी दुपारी राजूर-चनेगाव रस्त्यावर घराचे काम सुरू आहे, या ठिकाणी बसले होते. त्यावेळी मागच्या बाजूने अज्ञात दोन जण तोंडाला कपडा बांधून आले व त्यांनी काही कळण्याच्या आतच कुंमकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले, त्यामध्ये कुंमकर हे जागीच ठार झाले. यानंतर आरोपींनी पळ काढला.
ही घटना शेजारी राहत असलेल्या एका महिलेने बघितली, मात्र तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच सपोनि वेशाली पवार यांनी कर्मचारी यांच्या सोबत घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रविवारला राजूरचा आठवडी बाजार असल्याने ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. नागरिकांनी गोरक्षनाथ कुमकर यांच्या खून झालेल्या घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.