दैव बलवत्तर ! टायर फुटले, ट्रक उलटला; सुदैवाने जिवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 18:21 IST2021-02-03T18:18:56+5:302021-02-03T18:21:47+5:30
Accident at Jalana बीडकडून विटा भरुन आणल्यानंतर ट्रक जालन्यातील एका व्यावसायीकाला या विटा देण्यासाठी हा ट्रक अंबड चौफुलीकडून येत होता.

दैव बलवत्तर ! टायर फुटले, ट्रक उलटला; सुदैवाने जिवितहानी टळली
जालना : बीड जिल्ह्यातील परळी येथून विटा घेऊन आलेल्या ट्रकचे पुढील टायर फुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून, दुभाजकावर आदळून उलटला. हा अपघात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मंठा बायपासवरील अंबड चौफुलीच्या काही अंतरावर घडला. सुदैवाने यात काही जिवितहानी झाली नाही. ट्रकमध्ये असलेले चालक, क्लिनर सुखरुप बाहेर पडले.
बीडकडून विटा भरुन आणल्यानंतर ट्रक जालन्यातील एका व्यावसायीकाला या विटा देण्यासाठी हा ट्रक अंबड चौफुलीकडून येत होता. परंतू, काही अंतरावर आल्यानंतर समोरचे टायर फुटल्याने ट्रक दुभाजकाला जाऊन भिडला. या जबरदस्त धडकेत नुकतेच तयार करण्यात येत असलेला एका पथदिव्याचा खांबही तुटला आहे. दरम्यान, मंठाकडून येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रक पलटी होत असतांना पाहताच जागीच दुचाकी थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रक उलटल्यामुळे चाके निखळली होती. तर ट्रकचा पाटाही तुटला होता. अपघातानंतर ट्रकमधील संपूर्ण विटा रोडवर पडल्या होत्या. यानंतर काही वेळ वाहतूक जाम झाली होती. परंतू, विटा बाजूला करुन नंतर रस्ता सुरळीत करुन देण्यात आला. दुपारनंतर त्या ट्रकमधील विटा दुसऱ्या ट्रकमध्ये टाकून नेण्यात आल्या.