जालन्यात घंटागाडीच्या धडकेत दीड वर्षीय बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 19:51 IST2020-01-27T19:49:55+5:302020-01-27T19:51:18+5:30
ही घटना सोमवारी सकाळी जुना जालना शहरातील शिषटेकडी भागात घडली.

जालन्यात घंटागाडीच्या धडकेत दीड वर्षीय बालकाचा मृत्यू
जालना : घंटागाडीने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका दीड वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी जुना जालना शहरातील शिषटेकडी भागात घडली.
शेख गुफरान शेख ईजास (वय दीड वर्षे) असे मयत मुलाचे नाव आहे. जुना जालना शहरातील शिषटेकडी भागात राहणारा शेख गुफरान शेख ईजास हा मुलगा सोमवारी सकाळी रस्त्यावरून जात होता. त्यावेळी भरधाव आलेल्या घंटागाडीने (क्र.एम.एच.२१- डी. १९५८) त्याला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घंटागाडीचा चालक कृष्णा मदन खंदारे (रा. नूतन वसाहत, जुना जालना) असे असल्याची माहिती शेख ईलियास शेख अहेमद शेख यांनी कदीम पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.