अंबडच्या लालवाडी शिवारात जिलेटिनचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 19:00 IST2018-09-25T18:59:18+5:302018-09-25T19:00:16+5:30
लालवाडी शिवारात गोठ्यामध्ये लपून ठेवलेल्या धोकादायक ४०७ जिलेटीन कांड्याचा साठा पोलिसांनी जप्त केला.

अंबडच्या लालवाडी शिवारात जिलेटिनचा साठा जप्त
अंबड (जालना ) : अंबड तालुक्यातील लालवाडी शिवारात गोठ्यामध्ये लपून ठेवलेल्या धोकादायक ४०७ जिलेटीन कांड्याचा साठा पोलिसांनी सोमवारी रात्री जप्त केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर सुदाम काळे , सुदाम काळे यांच्या विरुध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोमवारी रात्री शहरात गस्तीवर असतांना लालवाडी शिवारात सुदाम काळे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये धोकादायक प्रतिबंधित स्फोटके असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नांदेडकर यांना खबऱ्याने दिली. पोलीस निरीक्षक नांदेडकर यांनी तातडीने दखल घेत पोलीस फौजफाटा घेवून मिळालेल्या माहितीनुसार काळे यांच्या शेतातील गोठ्याची पंचासमक्ष तपासणी केली असता.एका पत्र्याच्या शेडमध्ये गोण्यामध्ये लपवून ठेवलेला ४०७ जिलेटीनच्या नळकांड्या आढळून आल्या हे जेलिटीन नेमके कोणाकडून आणले याचा शोध पोलीस घेत आहे.