पारोळ्यानजीक टँकर उलटून गॕस गळती; परिसरातील रहिवाशांना अन्यत्र हलविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 10:50 IST2025-02-05T10:50:27+5:302025-02-05T10:50:47+5:30
ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर पारोळा महामार्गावर घडली.

पारोळ्यानजीक टँकर उलटून गॕस गळती; परिसरातील रहिवाशांना अन्यत्र हलविले
राकेश शिंदे /पारोळा (जि.जळगाव) : पारोळ्यानजीक गॕस टँकर उलटून त्यातून मोठ्या प्रमाणात गॕसची गळती झाली. त्यामुळे आजूबाजूच्या काॕलन्यांमधील रहिवाशांना इतरत्र हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर पारोळा महामार्गावर घडली.
गॅस गळती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल व जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापनाला देखील कळवण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार, शहर तलाठी निशिकांत माने यांच्यासह पोलिस यंत्रणा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ग्रीन लाईन कंपनीचा टँकर होता. त्यात लिक्विड नॅचरल गॅस साधारण पंधरा टन आहे. चालक सुभाषचंद्र सरोज (वय ३३, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा होता. परिसरात ॲम्ब्युलन्स व अग्निशमन वाहने देखील तैनात करण्यात आली आहेत.