सेवानिवृत्तीबद्दल गंगा पाटील यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:00+5:302021-01-03T04:31:00+5:30
मंठा : तालुक्यातील केंधळी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील सह शिक्षिका गंगा सुंदरराव पाटील या सेवानिवृत्त झाल्या आहेत. याबद्दल संस्थेच्या ...

सेवानिवृत्तीबद्दल गंगा पाटील यांचा गौरव
मंठा : तालुक्यातील केंधळी येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील सह शिक्षिका गंगा सुंदरराव पाटील या सेवानिवृत्त झाल्या आहेत. याबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष कपिल आकात यांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कपिल आकात होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भारत खंदारे, सेवा निवृत्त मुख्याध्याध्यापक अंकुश मोरे, सुभाष घारे, जनार्धन घारे, मच्छिंद्र घारे, रावसाहेब काकडे, दशरथ घारे, प्रदीप नाईक यांची उपस्थिती होती. दरम्यान गंगा पाटील आणि संस्थेचे अध्यक्ष आकात यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या मुख्याध्यापिका गिरी यांनी प्रास्ताविक केले. एम. बी. गडधे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. बी. बोराडे यांनी आभार मानले. यावेळी ई. आर. खराबे, बी. एन. वैद्य, एस. एस. अंबरहंडे, यू. सी. धबाले, यू. व्ही. मगर, ए. आर. बोडखे, एन. बी. खंदारे, काळे, कांगणे आदींची उपस्थिती होती.