शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर उभारणीसाठी निधीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

पाथरवाला खुर्द येथे माझं गाव सुंदर गाव अभियान वडीगोद्री : अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथे ग्रामपंचायतीमार्फत ‘माझं गाव सुंदर ...

पाथरवाला खुर्द येथे माझं गाव सुंदर गाव अभियान

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील पाथरवाला खुर्द येथे ग्रामपंचायतीमार्फत ‘माझं गाव सुंदर गाव’ अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या सहकार्याने शुक्रवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी शाम हर्षे, ग्रामसेवक यु. आर. शिंदे, सचिन घाडगे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खैरे, रोजगार सेवक राहुल ढवळे, भाऊसाहेब हर्षे, ज्ञानेश्वर हर्षे आदींची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद शाळेत कर्करोग दिन साजरा

भोकरदन : जवखेडा ठोंबरी येथील जिल्हा परिषद शाळेत तंबाखूमुक्त शाळा अभियानअंतर्गत जागतिक कर्करोगदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थी सुमेध शिंगणे याने सर्वांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम सांगितले. यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल घायाळ, एस. एस. शिंगणे, पी. आर. ठोंबरे, डी. एस. घोरपडे, पी. व्ही. मिसाळ, ए. बी. काशीद, ए. एस. ठोंबरे, आदित्य वाघ आदींची उपस्थिती होती.

माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी

कुंभारपिंपळगाव : येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी रोहिदास शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ॲड. राजकुमार खरात यांनी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा भीमा स्मरण भीमा स्तुती धम्मपालन गाथा घेतली. यावेळी राजकुमार खरात, जनार्दन शिंदे, भीमराव शिंदे, रामभाऊ जाधव, लिंबाजी शिंदे, विश्वनाथ शिंदे आदींची उपस्थिती होती.

जाफराबाद येथे अंधारातून प्रकाशाकडे अभियान

जाफराबाद : शहरात जमात - ए - इस्लामीतर्फे अंधारातून प्रकाशाकडे या अभियानांतर्गत शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी शेख लुकमान यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुमताज खान, सुखदेव अवकाळे, विनोद कळंबे, शंकर लहाने, संजय लहाने, सुधाकर चिंधोटे, सखाराम नवले, दत्ता नागरे, शेख तालेब, हाफीज नईम, शाजील शहा यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

बदनापूर शहरात वीस दिवसांआड पाणीपुरवठा

बदनापूर : बदनापूर नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात २० ते २५ दिवसाड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे जागोजागी पाईपलाईन फुटलेलेली असल्यामुळे पाणी वाया जात आहे. त्यामुळे नगर पंचायतीच्या या कारभारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष थेटे

जालना : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची पूर्वतयारी म्हणून रामनगर येथील हनुमान मंदिरासमोर बैठक घेऊन उत्सव समिती गठीत करण्यात आली. यात अध्यक्षपदी संतोष थेटे, उपाध्यक्ष राजू पिठुरे, सचिव निवृत्ती सरकाळे, कोषाध्यक्ष गणेश सोनुने, सदस्य योगेश शेजूळ, माऊली सरकाळे, गणेश शेजूळ, शिवाजी थेटे यांची निवड करण्यात आली. बैठकीला ॲड. सोपान शेजूळ, नाथाभाऊ सोनुने, शरद सोनुने, गोपाल मोरे, अंकुश लकडे आदींची उपस्थिती होती.