शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

चार वाहनांचा विचित्र अपघात; दोन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:21 AM

मंठा रोडवरील देवगाव फाट्याजवळील गुरुद्वारासमोर रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन दुचाकी, एक पिकअप व एका ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : मंठा रोडवरील देवगाव फाट्याजवळील गुरुद्वारासमोर रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दोन दुचाकी, एक पिकअप व एका ट्रकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.पांडुरंग तुळशीराम शिंदे (२५, रा. कुंभारी ता.सेलू) व बापूराव शेषराव खराबे (६५ रा. हेलस, ता. मंठा) असे मयतांची नावे आहे.नांदेड -जालना महामार्गावरील देवगाव फाट्याजवळ पांडुरंग शिंदे व बापूराव खराबे दुचाकी क्र. (एमएच. ३८. ए. ६७९३) ने मंठ्याकडे जात असतांना जिंतूरकडून येणाऱ्या पिकअपने क्रं (एमएच. २२. बीएच. २०९७) दुचाकीला धक्का दिला. पिकअपच्या पाठीमागून येत असलेल्या दुचाकीने शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली.यामुळे पाठीमागून येणाºया ट्रकच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार पांडूरंग शिंदे, बापूराव खराबे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुस-या दुचाकीवरील वसंत चव्हाण हे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नवनाथ लोखंडे, शिवाजी गिरी यांनी वाहतूक सुरळीत केली.दरम्यान, या अपघातामुळे मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.शिर्डी येथील घटना : खामखेडच्या तरुणाचा पाय-यावरून पडून मृत्यूराजूर : शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी गेलेल्या भोकरदन तालुक्यातील खामखेडा येथील तरूणाचा पाय-या उतरतांना खाली कोसळून अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.खामखेडा येथील कृष्णा विठ्ठल नागवे (२४) हा गावातील आठ ते नऊ मित्रासंह शुक्रवारी सायकाळी जीपने शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. मध्यरात्री त्यांनी शिर्डीत खाजगी लॉज करून आराम केला.सकाळी झोपेतून ऊठल्यानंतर खाली पायºया उतरतांना पायऱ्यांचा अंदाज न आल्याने कृष्णा जिन्यातून खाली कोसळला. त्यातच त्याच्या मेंदूला जबर मार लागल्याने बेशुध्द पडला. बेशूध्दावस्थेत त्याला साईबाबा देवस्थानच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पं. स. उपसभापती गजानन नागवे यांच्यासह नातेवाईकांनी शिर्डीकडे धाव घेतली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूroad transportरस्ते वाहतूक