चार दुकाने फोडली, लाखोचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:35 IST2018-11-11T00:35:39+5:302018-11-11T00:35:58+5:30
किराणा, ज्वेलर्स, औषधीचे दुकान भाऊबीजेच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सकाळी ३ वाजेच्या सुमारास मुख्य वस्तीतील चार दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला.

चार दुकाने फोडली, लाखोचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : शहरातील मुख्य रस्त्यावरील किराणा, ज्वेलर्स, औषधीचे दुकान भाऊबीजेच्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सकाळी ३ वाजेच्या सुमारास मुख्य वस्तीतील चार दुकाने फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. चार दुकानाच्या शटरच्या दोन्ही कुलूप तसेच ठेवून शटर उचकटून चोरीचा शहरातील पहिलाच प्रकार असल्याने व्यापारी वर्गात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.
एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी चार चोऱ्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील दुर्गा चौकातील बाबा किराणा यांचे मुख्य रस्त्यावरील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले. शटरच्या दोन्ही कुलूप आहे तशाच ठेवून लोखंडी अवजाराने शटर उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम व किराणा वस्तू असा एकूण ६० ते ७० हजाराचा ऐवज चोरून नेला. सकाळी दुकान उघडताच हा प्रकार लक्षात आला. दुसरे बालाजी ज्वेलर्स, भोसले मेडिकल व स्वस्तिक हर्बल या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारला.
विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्हीचा संच कॅमेºयासह लंपास केला. चोरटे शोधण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर निर्माण झाले आहे.